नवी दिल्ली, १५ ऑगस्ट २०२२: ओला इलेक्ट्रिकने आज स्वातंत्र्य दिनानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक जगाला दाखवली आहे. यासोबतच कंपनीने नवीन स्कूटर Ola S-1 लाँच केली आहे. कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी सांगितले की, Ola S1 ची सुरुवातीची किंमत ९९,९९९ रुपये असेल. ओलाचे हे दुसरे इलेक्ट्रिक उत्पादन आहे.
जबरदस्त असू शकते रेंज
भावेश अग्रवाल यांनी ओलाच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक दिली आहे. त्यांनी सांगितले की ओलाची पहिली कार २०२४ मध्ये येईल आणि ती उत्तम तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. ओलाच्या इलेक्ट्रिक कारची रेंज ५०० किमी असेल. दाखवलेल्या व्हिडिओनुसार, ओलाची पहिली कार सेडान सेगमेंटमध्ये असू शकते.
ऑल-ग्लास रूफ
ओला इलेक्ट्रिक कारमध्ये ऑल-ग्लास रूफ असेल. यामुळे कारच्या एरो-डायनॅमिक्समध्ये सुधारणा होईल. ओलाने नुकतीच आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक दाखवली आहे. भावेश अग्रवाल यांनी सांगितले की, ओलाची कार केवळ की लेस च नाही तर ती ड्राइवर लेसही असेल. यात असिस्टेड ड्रायव्हिंग फीचर्स देखील मिळतील. आमची कार सर्वात वेगवान असेल, असा दावा त्यांनी केला.
भावेश म्हणाले की, ही भारतात बनवलेली सर्वात स्पोर्टी कार असेल. दोन व्हीकल प्लॅटफॉर्म आणि सहा वेगवेगळ्या कार विकसित करण्याची त्यांची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व तामिळनाडू येथील कारखान्यात तयार केले जातील.
Ola S-1 स्कूटरसाठी बुकिंग
याशिवाय कंपनीने Ola S-1 बाजारात आणली आहे. भावेश यांनी सांगितले की, नवीन Ola S-1 स्कूटरचे बुकिंग आजपासून सुरू होत आहे. केवळ ४४९९ रुपये भरून विशेष प्रास्ताविक किंमतीवर ही बुक केली जाऊ शकते. नवीन ई-स्कूटरची डिलिव्हरी ७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ती चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, Ola S-1 hi S-1 Pro सारखीच दिसते आणि या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
Ola S1 Pro कंपनीने गेल्या वर्षी लॉन्च केली होती. Ola S1 मध्ये ३ kWh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की नवीन स्कूटरची रेंज १३१ किमी आणि टॉप स्पीड ९५ किमी/तास आहे. नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाल, जेट ब्लॅक, पोर्सिलेन व्हाइट, निओ मिंट आणि लिक्विड सिल्व्हर या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केली जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे