केंद्र सरकारने २० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना आता वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे, ज्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आता दुप्पट शुल्क भरावे लागेल. केंद्रीय मोटार वाहन (तृतीय सुधारणा) नियम, २०२५ नुसार हे बदल करण्यात आले आहेत.
नवीन नियमांनुसार, २० वर्षांपेक्षा जुन्या दुचाकीसाठी नूतनीकरण शुल्क रु. २,०००, तीनचाकीसाठी रु. ५,०००, तर चारचाकीसाठी रु. १०,००० निश्चित करण्यात आले आहे. तसेच, जर वाहन १५ वर्षांनंतर पुन्हा नोंदणी केले नाही तर दुचाकीसाठी दरमहा ३०० आणि चारचाकीसाठी ५०० रुपये दंड आकारला जाईल. या निर्णयामुळे जुनी वाहने वापरणे आता अधिकृत झाले असले तरी, वाढीव शुल्कामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले












































