ओमायक्रॉनच्या नव्या XXB सब व्हेरिएंटची भारतात एंट्री; या चार राज्यांत सापडले रुग्ण

नवी दिल्ली,१४ ऑक्टोबर २०२२: ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटची भारतात एंट्री झाली आहे. आतापर्यत ओमायक्रॉनच्या नवीन XXB सब-व्हेरिएंटची ७१ प्रकरणे भारतात नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्रत गुरुवारी या व्हेरिएंटची पाच प्रकरणांची नोंद झाली आहे.

याआधी पश्चिम बंगाल, ओडीशा आणि तमिलनाडुमध्ये या सब व्हेरिएंटची लागन झालेले रुग्ण आढळले आहेत. गेल्या १५ दिवसात ओडिशात ३३, बंगालमध्ये १७ आणि तमिलनाडुमध्ये १६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. XXB हे ओमायक्रॉनच्या BA.2.75 आणि BJ.1 प्रकरांच्या संयोजनाने बनलेले आहे.

कोरोना संसर्ग झालेल्यांना रुग्णाल्यात दाखल करणे आवश्यक आहे. हा व्हायरस नेमका किती गंभीर आहे. याबाबत माहिती समोर आलेली नाही. जसाजसा हिवाळा जवळ येत आहे. तसतसे नवीन कोविड लाटेचा धोका वाढत आहे. ओमायक्रॉन सबव्हेरिएंट BA.4 आणि BA.5 यांनी गेल्या वर्षी कहर केला होता.

चिंतेची बाब म्हणजे आता ओमायक्रॉनचे नवीन सबव्हेरिएंट आता पुन्हा समोर येत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नव्या XXB सब व्हेरिएंटची भारतात एंट्री; या चार राज्यांत सापडले रुग्णर्गायझेशन च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शास्त्रज्ञ ओमायक्रॉनच्या शेकडो नवीन प्रकारांवर लक्ष ठेवून आहेत. या नवीन व्हेरिएंटमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा