मध्य प्रदेश, ४ ऑगस्ट २०२० : ५ ऑगस्ट ला होणा-या राम मंदिर भूमीपुजनच्या कार्यक्रमाची तयारी अयोध्येत जोरदार चालू असून संपुर्ण अयोध्या नगरी भुमिपुजनाची आतुरतेने वाट बघत असून सर्व कार्यक्रमांसाठी सज्ज आहे . मात्र याच पार्श्वभूमीवर भाजपाला सतत कोरोनाचे झटके बसले आहेत. ज्यामुळे हा मुहूर्तच अशुभ असल्याचे राष्ट्रीय काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.तर तसेच त्याची ६ कारणे देखील त्यांनी दिली आहेत.
१) राम मंदिराचे सर्व पुजारी कोरोना पाॅजिटिव्ह.
२) उत्तर प्रदशचे मंत्री कमला रानींचे कोरोनामुळे निधन.
३) उत्तर प्रदशचे प्रदेश आध्यक्ष कोरोना पाॅजिटिव्ह.
४) गृहमंत्री अमित शाह कोरोना पाॅजिटिव्ह रुग्णालयात दाखल.
५) मध्य प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री कोरोना पाॅजिटिव्ह.
६) कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री कोरोना पाॅजिटिव्ह रुग्णालयात दाखल..
हि सहा कारणे त्यांनी दिली असून राममंदिर भूमीपुजनच्या अशुभ मुहूर्त असल्याचे त्यांनी सांगितले तसेच काही याच संदर्भात प्रश्न त्यांनी योगी सरकार आणि उमा भारती यांना केले आहेत.
काँग्रेस हिंदुत्वाकडे……
नेहमी हिंदुत्वापासून दूर राहणारे काँग्रेसचेे नेते हे आता मध्य प्रदेश मधील पोटनिवडणुकीत हिंदुत्वाच्या मार्गाचा अवलंब केल्याचे दिसत आहे. राम मंदिर उभारणीची इच्छा हि पंतप्रधान राजीव गांधी यांची हि होती असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले तर पंतप्रधान राजीव गांधी यांनी बाबरी मशिदीतील राममंदिराचे कुलुप हे हिंदूसाठी उघडले असे कमलनाथ यांनी वक्तव्य केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी