भाजपच्या वतीने कोरोना योध्यांना प्रशस्तीपत्र देऊन केले सन्मानित….!

वाघोली, दि. १९ ऑगस्ट २०२० :कोरोना संसर्ग महामारी काळामध्ये समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्यसेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, यांना पुणे जिल्हा भाजपच्यावतीने आव्हाळवाडी येथे कोरोनायोद्धा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

मागील पाच महिन्याच्या कोरोना कालावधीमध्ये आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत आव्हाळवाडी ता. हवेली येथे पुणे जिल्हा भाजपच्यावतीने कोरोना योध्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले आहे.

तसेच राख्या बांधून कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले आहे.

यावेळी पुणे जिल्हा भाजप कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, आव्हाळवाडी ग्रामपंचायत सदस्य कल्पना सातव, संगीता सस्ते, निर्मला सातव, सविता तांबे, पूजा कुटे, गोकर्ण कोहकडे, सुवर्ण आव्हाळे, रंजना सातव, स्वाती दारवाटकर, मंगल गवते, चंदा गायकवाड, अंगणवाडी सेविका शिक्षिका व नागरिक आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा