शिक्रापूर पोलिसांच्या वतीने, कोरोना रुग्णाचा अंत्यविधी करण्यात आला

शिक्रापूर, दि. ०७ सप्टेंबर २०२०:शिक्रापूर मध्ये कोरोना बाधित मृत व्यक्तीचा अंत्यविधीसाठी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. मात्र शिक्रापूर पोलिसांच्या हस्तक्षेपाने कोरोनाबाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मागील आठ दिवसापूर्वी शिक्रापूर येथे मृत व्यक्तीचा प्रशासनाकडून शिक्रापूर स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी करण्यात आला होता. मात्र या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर चार दिवसापासून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला आहे.

आज सणसवाडी येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यानंतर प्रशासनाने त्याचा अंत्यविधी करण्यासाठी शिक्रापूर स्मशानभूमीत आणला यावेळी तुषार आळंदीकर, स्वप्नील महाजन, म्हणाले की प्रशासन कोरोनाग्रस्त मृत व्यक्तीवर अंत्यविधी करून निघून जातात त्यानंतर लक्ष देत नाहीत असे सांगून त्यास विरोध केला.

दरम्यान पोलिसांनी यावेळी स्थानिक नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीकडे दिल्यानंतर तो तक्रार अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला जाईल असे शिक्रापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बि. बि. गोरे यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा