मुंबई, 29 जून 2022: महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाला मोठं नाट्यमय वळण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. या बैठकीला त्यांच्यासोबत काही आमदारही उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी राज्यपाल कोशारी यांच्याकडे बहुमत चाचणीसाठी मागणी केली आहे. यामुळं इतके दिवस भाजप या सर्व प्रकरणातून बाजूला राहण्याचा प्रयत्न करत होती. मात्र आता भाजपची भूमिका स्पष्ट झालीय.
फडणवीस यांनी राज्यपालांकडं बहुमत चाचणीची मागणी केलीय. 30 तारखेला बहुमत चाचणीसाठी सरकारला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी फडणवीस यांच्याकडून करण्यात आलीय. तसंच काही आमदारांचं पत्रही राज्यपाल कोश्यारी यांना प्राप्त झालं आहे. अशावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलावलं आहे.
कशी असेल प्रक्रिया
राज्यपाल कोश्यारी यांनी 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यानुसार 30 जून रोजी सकाळी 11 वाजता अधिवेशन सुरू होईल. यानंतर 5 वाजेपर्यंत सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल. यासंबंधी पत्र देखील राज्यपालांनी सचिवांना पाठवलं आहे. बहुमत चाचणी सुरू झाल्यानंतर होणारी भाषणं ही छोट्या स्वरूपात असतील. बहुमत चाचणी वेळी व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात येणार आहे. तसेच सदनाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी सभासदांना सुरक्षा प्रदान केली जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे