स्वातंत्र्यादिनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून विश्वकर्मा योजनेची घोषणा, १५००० कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली, १५ ऑगस्ट २०२३ : स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशभर उत्साहाचे वातावरण आहे. देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. स्वातंत्र्यदिना निमित्त उत्साह आणि चैतन्याने भरलेले वातावरण पाहायला मिळले. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा फडकावला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांच्या वतीने तिरंग्याला सलामी दिली. यावेळी संबोधित करताना त्यांनी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली.

भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी देशातील जनतेला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशातील कामगार, गवंडी, धोबी यांच्यासह आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक बळ देण्यासाठी एका मोठ्या योजनेची आज घोषणा केली. या योजनेतून सरकार कामगारांसाठी काम करणार आहे.

त्यांच्या उन्नतीसाठी पुढील महिन्यात सरकार १३,००० ते १५,००० कोटी रुपयांची तरतूद असणारी योजना सुरू करणार आहे. ही योजना विश्वकर्मा योजना असणार आहे. ही योजना देशातील फर्निचर किंवा लाकडाचे काम करणाऱ्या, सलून चालवणाऱ्या, शूज बनवणाऱ्या आणि घरे बांधणाऱ्या गवंड्यांना आर्थिक मदत करणार आहे. तसेच पारंपरिक कौशल्य असलेल्यांसाठी देखील ही योजना लागू असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा