मुंबई पुणे महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ अज्ञातांकडून बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

पुणे, १० ऑक्टोबर २०२२ : रविवारी रात्री उशिरा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ एका लक्झरी बसवर अज्ञात इसमानी दगडफेक केली. या धक्कादायक घटनेमध्ये बसचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले. या दगडफेकीमध्ये काही प्रवाशी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील फूड मॉलमध्ये प्रवासी आणि व्यवस्थापक यांच्यात वाद झाला होता. क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यामध्ये हा वाद झाला होता. यावरुनच ही दगडफेक करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. घटनेनंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सदर घटनेत खालापूर टोलनाक्याजवळ अज्ञातांनी या खाजगी बसवर दगडफेक केली आहे. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे बसमधील प्रवासी घाबरले होते. अचानक झालेल्या दगडफेकीत या लक्झरी बसच्या काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमीही झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा