केवडिया, ३१ ऑक्टोबर २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली वाहिली आणि ते म्हणाले की ते राष्ट्रीय एकतेचे प्रणेते आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे प्रणेते लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली वाहिली.
सरदार पटेल यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त एकता दिन सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले आहेत. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५ वी जयंती देशात साजरी होत आहे. यानिमित्ताने केवडिया, गुजरातमध्ये आयोजित ऐक्यदिन सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान आले आहेत.
स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पंतप्रधानांनी पुष्पांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी अजूनही नर्मदा जिल्ह्यातील केवडियामध्ये आहेत. त्यांच्या गुजरात दौर्याचा आज दुसरा दिवस आहे.शुक्रवारी त्यांनी गुजरातमधील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे