नागपूर, २० डिसेंबर २०२२ : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी आलेल्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना जेवणासाठी पैसे मोजल्यावरही पहिल्याच दिवशी उपाशी राहण्याची वेळ आली. या जेवण न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी शेवटी विधान भवनाच्या प्रवेशद्धारापुढील जेवणाच्या स्टॉलपुढे गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता.
हिवाळी अधिवेशनात कडेकोट सुरक्षा देण्यासाठी राज्यातील विविध भागांतील पोलिस उपराजधानीत तैनात करण्यात आले आहेत. या पोलिसांना माफक दरात चांगले जेवण उपलब्ध करण्यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट दिले गेले. तर काही कर्मचाऱ्यांना २५० रुपयांत दहा दिवसांच्या जेवणाचे कुपन देण्यात आले होते. या कुपनवर जेवणाचे कोणतेही शुल्क नमूद केले नसल्याचेही संतप्त कर्मचाऱ्यांनी सांगितले. सोमवारी शेकडो कर्मचाऱ्यांवर चुकीच्या व्यवस्थापनामुळे उपाशी राहण्याची वेळ आली. किमान आज मगंळवारी सगळ्यांना व्यवस्थित जेवण मिळणार काय? हा प्रश्न येथे उपस्थित कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर