मुंबई, २५ डिसेंबर २०२२: एक मितभाषी नेतृत्व, संवेदनशील व्यक्तिमत्व, कवी आणि जगन्मित अशी ख्याती असणाऱ्या भारताच्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. २५ डिसेंबर या अटलजींच्या जयंतीचे निमित्त साधून पंकज आणि रवी जाधव यांनी चित्रपटाचा एक छोटासा टीझर आउट केला आहे. ‘मैं अटल हूं’ या चित्रपटातील माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत अभिनेता पंकज त्रिपाठी दिसणार आहेत.राष्ट्रीय पुरस्कार विजेते रवी जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होईल.
काल म्हणजेच शनिवारी पंकज त्रिपाठींनी एका नव्या पोस्टच्या माध्यमातून आपल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील बायोपिकचे नाव जाहीर केले. त्यानंतर पंकज त्रिपाठींचा फर्स्ट लूक रिव्हील करण्यात आला. या व्हिडिओमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या विविध छटा पंकज स्वरूपाने दाखवण्यात आल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CmlBd3gIM1b/?igshid=MDM4ZDc5MmU=
पंकज त्रिपाठींची पोस्ट :
‘अटलजी यांचे व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्यासाठी अत्यंत संयमाने मला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर काम करणे गरजेचे आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतू स्फूर्ती आणि मनोबल याच्या जोरावर मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन असा मला अटल विश्वास आहे. कधी डगमगले नाहीत, कधीही डोके टेकवले नाही, मी एक अद्वितीय शक्ती आहे, मी अटल आहे. हे अद्वितीय व्यक्तिमत्व पडद्यावर व्यक्त करण्याची संधी मिळाली. मी भावनिक आहे आणि मी आभारी आहे.
https://www.instagram.com/reel/Cmk-kaHoBgd/?igshid=MDM4ZDc5MmU=
पंकज त्रिपाठींचा या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पुढील वर्षी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिनी म्हणजेच २५ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे