वाढदिवसा निमित्त मोदींच्या हस्ते कुनो अभयारण्यात चित्त्यांना मुक्त केलं जाणार

मध्यप्रदेश १५ सप्टेंबर २०२२ : भारतात चित्यांच्या आगमनापेक्षाही, हे विशेष आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवशी त्या चित्त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करणार आहेत. देशाला चित्त्यांची भेट देण्यासाठी, पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवशी, ७४४ चौरस किलोमीटर जंगलाच्या मध्यभागी उतरवण्याची तयारी सुरक्षा यंत्रणांनी दर्शवली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी उर्वरित प्रोटोकॉल तसेच राहतील.

या आफ्रिकन चित्त्यांना ७० वर्षांनंतर भारतातील जंगलात सोडण्याची ही घटना अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडेल. त्यादरम्यान केवळ निवडक व्हीआयपी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी असतील. कॅमेऱ्यांच्या मदतीनेच नागरिकांना हे दृश्य पाहता येईल.

१६ सप्टेंबर रोजी चित्त्यांना आफ्रिकेतून विशेष विमानाने पाठवण्यात येणार आहे. ते थेट जयपूरमध्ये उतरणार असल्याचे कळतेे. यानंतर त्यांना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने थेट कुनो नॅशनल पार्कच्या मध्यभागी उतरवले जाईल. येथे चित्ता हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार आहेत. पंतप्रधानांच्या आगमनाच्या अवघ्या ४ तास आधी चित्ते कुनोला पोहोचतील, म्हणजेच सकाळी ८ वाजता कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांचे आगमन होईल. पंतप्रधान मोदी त्यांचे पिंजरे उघडे पर्यंत ते कुनोच्या हवामानाशी थोडे जुळवून घेतील.

पंतप्रधानांव्यतिरिक्त मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय वनमंत्री आणि मध्य प्रदेशचे वनमंत्री मंचावर असतील. या मंचाच्या अगदी खाली ६ फुटांच्या पिंजऱ्यात चित्ते असतील. मंचापासून ५० फूट अंतरावर, चित्त्यांसाठी विलगीकरण केंद्र आहे. पंतप्रधान मोदी दोन नर आणि एक मादी चित्ता पिंजऱ्याबाहेर सोडणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ठीक बारा वाजून पाच मिनिटांनी लीव्हर हँडल फिरवून चित्त्याच्या पिंजऱ्याचे गेट उघडतील. पिंजऱ्यांना सरकते दरवाजे असतील, जे लीव्हर वळल्यावर उघडतील. काही मिनिटे चालल्यानंतर चित्ते समोरच्या विलीगिकरण सेंटरमध्ये जातील.

मोदींच्या हस्ते चित्त्यांच्या सुटकेचे थेट प्रक्षेपण केले जाईल

विलीगिकरण आणि हवामानाशी जुळवून घेतल्यानंतर डिसेंबरमध्ये चित्त्यांना खुल्या जंगलात सोडण्यात येईल. त्यानंतर त्यांना जंगल सफारी दरम्यान पाहता येईल.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा