भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरात फुलांची आरास

5

पंढरपूर, २६ जानेवारी २०२४ : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. संत तुकाराम भवन व श्री. विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. तसेच श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरात फुलांची आरास, विद्युत रोषणाई व श्री ला पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले.

श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरात तिरंगा रंगाची फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दानशूर भाविक श्री. सचिन चव्हाण, पुणे यांनी ही मोफत सेवा दिली असून, याकामी दिड ते दोन टन झेंडू व शेवंती फुलांचा वापर केला आहे. तसेच श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर, नामदेव पायरी, श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास व दर्शन मंडपावर आकर्षक नयनरम्य अशी तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री.संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये आजच्या भोजन प्रसादात गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला असून, श्री. विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिल्लारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा