थेऊर येथील वाळूच्या साठ्यावर भरारी पथकाची कारवाई

लोणी काळभोर: जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी ताबडतोब हरकत घेत महसूल विभागातील अधीकारी विभागातील अधीकारी वर्गास कारवाईचे आदेश दिले. परंतु यावरही वाळू उपसा थांबत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी एक शिग्र कृती दल तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
हवेली तालुक्यातील मूळा – मूठा नदीतील बेसुमार वाळू उपसा होत असताना महसूल विभागातील अधिकारी काय व कधी कारवाई करणार हे औत्सुक्याचे होते. परंतु  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सूचना केल्यावर कृती दलाने दौंड तालुक्यातील काही ठिकाणी वाळू उपशावर कारवाई केल्यानंतर त्यांना हवेली तालुक्यातील थेऊर परिसरात औद्यरित्या वाळू उपसा होत असल्याची खबर मिळाली होती. त्यावर या पथकाने मूळा मुठा नदीच्या परिसरात तपासणी केली असता नदीतून वाळू उपसा करून तो येथील गट क्र.७३० अ तसेच ७३० ब मध्ये साठा केल्याचे दिसून आले. परंतु तेथे वाळू उपसा करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा नव्हती. यावर थेऊरच्या मंडल अधीकारी गौरी तेलंग यांना याची माहिती देऊन पंचनामा करण्याचे सुचवले.
त्यानंतर मंडल अधीकारी यांनी या ठिकाणी पंचासह जाऊन पंचनामा केला त्यात गट नं .७३० अ व ब मध्ये अंदाजे पाच ब्रास वाळू साठवलेली आढळून आली असे नमूद केले आहे. यावर महसूल काय कारवाई करणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण नदीतून बेसुमार वाळू उपसा झालेला आहे आणी गेल्या अनेक वर्षे येथे वाळूचे लिलावे झाले नाहीत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा