पंजाब मध्ये वीज निर्मिती ठप्प होण्याच्या मार्गावर, शेतकरी आंदोलनामुळं मालगाड्या बंद

5

बठिंडा, ३० ऑक्टोंबर २०२०: शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं रेल्वे ट्रॅक व मालवाहतूक करणार्‍या रेल्वेगाड्यांच्या सुरक्षेचा विचार करता भारतीय रेल्वेनं पंजाबला येणार्‍या सर्व मालगाड्या रद्द केल्या आहेत. या माला गाड्या रद्द केल्यामुळं पंजाबमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यामुळं उद्योगासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत, परंतु सर्वात मोठा धोका पंजाबमध्ये ब्लॅकआऊट होण्याचा आहे.

पंजाब मध्ये वीजनिर्मितीसाठी जे थर्मल प्लांट आहेत त्यामध्ये कोळशाचा पुरवठा इतर राज्यातून केला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे हा कोळसा वाहून नेण्यासाठी रेल्वेचा वापर केला जातो. सरकारच्या शेतीविषयक कायद्याच्या विरोधात पंजाब मधील शेतकरी आंदोलन करत आहे, त्यामुळं सर्वच रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामध्ये माल गाड्यांची वाहतूक देखील थांबली आहे. पण, यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी असं म्हटलं आहे की, आम्ही केवळ प्रवासी रेल्वेगाड्या थांबवत आहोत. परंतु, मालवाहतूक रेल्वे गाड्यांना आमचा कोणताही विरोध नाही.

असे असूनही, केंद्र सरकारनं पंजाब सरकारला सांगितलं आहे की, जर त्यांनी मालगाड्या आणि रेल्वे रुळांच्या सुरक्षेची हमी दिली तर केवळ मालगाड्या पंजाबला पाठवल्या जातील. पंजाब आणि केंद्र सरकारच्या या लढाईत आता पंजाबवर ब्लॅक आऊट होण्याचा धोका वाढला आहे.

सद्यस्थिती काय आहे

बठिंडामधील तलवंडी साबो येथे पंजाबमधील सर्वात मोठा औष्णिक प्रकल्प २००० मेगावॅट वीजनिर्मिती करतो. नाभा, पटियाला येथे आणखी एक मोठा औष्णिक प्रकल्प १,४०० मेगावॅट वीजनिर्मिती करतो. यासह पंजाब मध्ये आणखीन तीन छोटे छोटे थर्मल प्लांट आहेत जे पंजाबमध्ये विजेची कमतरता भासू देत नाहीत.

परंतु कोळशाचा सतत पुरवठा होत नसल्यामुळं आता या सर्व थर्मल प्लांट्समध्ये केवळ १ ते २ दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. या कारणास्तव, येत्या काही दिवसांत पंजाबमध्ये वीज कपात वाढंल आणि त्याचवेळी राज्यात ब्लॅकआउट होण्याचा धोका आहे. दोन मोठे थर्मल प्लांट बंद झाले आहेत आणि तीन छोट्या थर्मल प्लांट्समध्ये फक्त १ ते २ दिवसांचा कोळसा शिल्लक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा