गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा इंदापूर तालुक्यातील गागरगाव येथे दीड किलो गांजा पकडला

इंदापूर तालुक्यातील गागरगाव येथे दीड किलो गांजा पकडला

इंदापूर, दि.२२ मे २०२०: इंदापूर तालुक्यातील गागरगाव या ठिकाणी आज (शुक्रवारी) इंदापूर पोलिसांनी धाड मारून जवळपास दीड किलो गांजा जप्त केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर पोलिसांना गागरगाव नजीक लोंढेवस्ती याठिकाणी गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोंढे वस्ती येथे धाड टाकून रघुनाथ विठ्ठल लोंढे आणि नंदा संजय खरात यांच्याकडे गांजा मिळून आला.

यामध्ये ३६ हजार सहाशे रुपयांचा एक किलो २०० ग्रॅम वाळला. गांजा ४१ गांजाचे पुडे एकूण ३२८ ग्रॅम ॲल्युमिनियम गमेली आणि गांजा भरून विकण्यासाठी दोन किलो वजनाच्या पिशव्या रघुनाथ विठ्ठल लोंढे यांच्याकडे आढळल्या .

तर चार गांजाच्या पुड्या नंदा खरात यांच्याकडे आढळल्या. एकूण ३७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो ताब्यात घेण्यात आला. त्यांच्यावर एनडीपीएस कलम २० ब प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आले आहे. फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version