गोल पोस्ट गुन्हा बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

बीड, दि. ३ जुलै २०२०: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एका गावात उसाच्या शेतात अल्पवयीन मुलीची हत्या करून तिचा मृतदेह लपविल्याच्या आरोपा खाली एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली.

वडवणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक महेशकुमार टाक यांनी सांगितले की, पोलिसांनी बुधवारी प्रकाश काशिनाथ भंगे यांना अटक केली. १४ वर्षाची मुलगी शीतल दादासाहेब तोगे हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. पीडित मुलगी चिकल बीड येथे राहणारी असून ती २८ जून रोजी बेपत्ता झाली होती आणि दोन दिवसानंतर उसाच्या शेतात तिचा मृतदेह सापडला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपीने तिचा गळा कापून हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह लपविला असल्याचे तपासात उघडकीस आले. आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version