गोल पोस्ट इतर राजकारण शरद पवार धमकी प्रकरणात एकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

शरद पवार धमकी प्रकरणात एकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई, १२ जून २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांना ही जीवे मारण्याची ही धमकी दिली होती त्यामुळे एकच खळबळ उडाली. राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता शरद पवार धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातून सागर बर्वे या युवकाला अटक करण्यात आली आहे.

सागर बर्वे हा युवक स्वतः आयटी इंजिनियर असल्याची माहिती मिळत आहे. त्याने फेक अकाऊंट तयार करून शरद पवार यांना धमकी दिली होती. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली. सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती.

दरम्यान, राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून सौरभ पिंपळकर या नावाच्या ट्वीटर हँडलवरून शरद पवार यांना ही जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असे नाव होते तर शरद पवार तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर या तरूणाचा देखील पोलिस शोध शोध घेत आहेत.

न्यूज अन कट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version