अकोले बुद्रुक येथे पिकअप झाडावर आदळून एक ठार

माढा, दि.१८ ऑगस्ट २०२०: माढा तालुक्यातील अकोले गावच्या हद्दीत पिकअप व्हैन झाडावर आदळून एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला अाहे, दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात टेंभूर्णी पंढरपूर रोडवर अकोले बुद्रुक येथे झाला आहे. जखमींना टेंभुर्णी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अंकुश संदिपान पाटोळे वय ४५ राहणार मेंढापूर तालुका पंढरपूर यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर उषा अंकुश पाटोळे या गंभीर जखमी झाल्या आहेत. चालक केदार दत्तू रोंगे वय ३२ राहणार आडीव तालुका पंढरपूर हे गंभीर जखमी झाले आहेत. पिकअप टेम्पो टेंभुर्णीकडे येत असताना अपघात झाला अकोले गावच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला बाभळीच्या झाडावर जाऊन पिकअप धडकला चालकाच्या शेजारी बसलेले पाटोळे दांपत्य गंभीर जखमी झाले असता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच वाटेतच अंकुश पाटोळे यांचा मृत्यू झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा