उजनीतून भीमेत एक लाख सत्तर हजार क्यूसेकने सोडले पाणी

माढा, १४ ऑक्टोबर २०२०: भीमानगर उजनी धरणातून भीमानदीत बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून 16 दरवाजातून एक लाख सत्तर हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असताना उजनी धरणाच्या जलाशयावर देखील बुधवारी दिवसभर पावसाने तुफान हजेरी लावली आहे. याचाच परिणाम धरणातील पाणी साठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. धरणाच्या पाणी साठ्यात वाढ तर होतच आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील दौंडमधून देखील पाण्याची आवक वाडत चालली आहे. यामुळे मंगळवारी 6600 क्यूसेकने विसर्ग सोडलेला बुधवारी दिवसभर 16600 क्यूसेक विसर्ग भीमानदीत सुरु होता. तर दुपारी 1 वाजता 20 हजार क्यूसेकने वाढवला दुपारी 3 वाजता 40 हजार क्यूसेकनी भीमानदीत पाणी सोडण्यात आले. तर हिकडे वीर धरणातूनही 24 हजार क्यूसेकने तर 4 वाजता 60 हजार क्यूसेक 4.30 वाजता 80 हजार क्यूसेक 8.39 वाजता 1 लाख 70 हजार क्यूसेक भीमेत पाणी सोडण्यात आले आहे. तर हिकडे वीर धरणातून 23 हजार 500 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे भीमा व नीरानदीच्या पाण्याने सोलापूर जिल्ह्यात भीमानदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यामुळे सोलापूर जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरण व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

 

उजनी धरण सद्यस्थिती:

दि. 14 /10/ 2020 सायं- 8 वा
एकूण पाणी पातळी-497.330 मीटर

एकूण पाणीसाठा- 3491.21दलघमी
(टीएमसी 123.28)

उपयुक्त पाणीसाठा-1688.40 दलघमी (टीएमसी59.62)

टक्केवारी- 111.28 टक्के

धरणात येणारा विसर्ग
दौंड विसर्ग- 4199
बंडगार्डन- 3900

धरणातून जाणारा विसर्ग
कालवा – 400
बोगदा – 200
वीजनिर्मिती -1600
भीमा नदी – 170000
वीर धरण 23500

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा