पुणे, १२ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी दहशतवादी संघटना ISIS च्या कारवायांना प्रोत्साहन देण्यात सक्रिय सहभागाबद्दल आणखी एकाला अटक केली. ठाण्यातील पडघा येथील शमील साकिब नाचन हा पुणेस्थित ISIS मॉड्युल प्रकरणी अटक करण्यात आलेला सातवा व्यक्ती आहे, असे दहशतवादविरोधी संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले.
अधिका-यांनी सांगितले की, शमील साकिब नाचन दहशतवादी कृत्ये करण्यासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) च्या निर्मिती आणि प्रशिक्षणात गुंतलेला असल्याचे आढळून आले. मात्र, तो इतर आरोपींच्या संगनमताने काम करत होता.
या प्रकरणातील अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेले सर्व सात आरोपी ISIS स्लीपर मॉड्यूलचे सदस्य आहेत, ते पुण्यातील कोंढवा येथील घरातून कार्यरत होते, जिथे त्यांनी आयईडी गोळा केला होता. एनआयएच्या म्हणण्यानुसार, या लोकांनी गेल्या वर्षी बॉम्ब बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करून त्यात भाग घेतला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड