पुरंदर, १९ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील नीरा येथील एका तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तरुणाच्या आत्महत्येनंतर नीरा परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नीरा येथील शिवतक्रारवाडी येथे राहणारे राजेंद्र सदाशिव कुऱ्हाडे (वय ४२) यांनी आपल्या रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबतची खबर मयाताचे चुलते सुदाम शंकर कुऱ्हाडे यांनी नीरा पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी जावून याबतची चौकशी सुरू केली असून आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस नाईक राजेंद्र भापाकर करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: