कुडाळ येथे ट्रक-दुचाकीचा अपघात, एकजण गंभीर जखमी!

4

कुडाळ, १४ ऑगस्ट २०२३ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ उधमनगर येथे ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास झाला. जखमींवर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून सावंतवाडीच्या दिशेने मालवाहू ट्रक जात होता. उधमनगर येथील लेन पास करून ट्रक मिडलकट मधून पुढे जात असताना पिंगुळीहून कुडाळच्या दिशेने येणाऱ्या दुचाकींची ट्रकला जोराची धडक बसली. यात दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला.

त्यांला गंभीर दुखापत झाली असून, त्यांला उपचारासाठी तातडीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुडाळ पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमीची ओळख पटविण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा