‘आर्यन्स ग्रुप’च्या यशोत्सवाचं एक पाऊल पुढं,आर्यन्स ग्रुपचं सोनेरी क्षेत्रात पदार्पण …

पुणे, 4 मे 2022: मंगळवारी 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावरती ‘आर्यन्स ग्रुप ॲाफ कंपनीज’ने आता भरारी घेत तीन नवीन क्षेत्रात पाऊल ठेवलं. ज्यांचा समावेश आर्यन्स यशोत्सवात करण्यात आला. आर्यन्स ग्रूपने आता फार्मा, सोने क्षेत्र आणि आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक अशा तीन क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं आता लवकरच आर्यन्स ग्रुप या क्षेत्रात आपले पाय रोवण्यास सुरुवात करत आहे. फार्मा क्षेत्रासंदर्भात आर्यन्स ग्रुप आणि धन्वंतरी ग्रुप संयुक्त विद्यमाने कार्य करत आहे आणि करणार आहे.

सोन्याला येणारी झळाळी आणि वाढता दर पाहता आता आर्यन्स ग्रुप सोन्याच्या गुंतवणुकीत प्रवेश करत आहे. यावेळी आर्यन्स गुप्र ॲाफ कंपनीच्या पहिल्या आधुनिक “गोल्ड रिफायनरचा” शुभारंभ झाला तसेच त्यामधून प्रथम तयार झालेल्या “शुध्द सोन्याचं” अनावरण करण्यात आलं. दागिने घडणावळीत आर्यन्स ग्रुप येत असून दिवाळीच्या दरम्यान हे दागिने लोकांच्या भेटीस येत आहे. याविषयी बोलताना आर्यन्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांनी भविष्यातल्या योजनांबद्दल माहिती दिली.


यावेळी आर्यन्स गुप्र ॲाफ कंपनीच्या फायन्यास कंपनी ‘मनस्मी फायन्यास’ कंपनीचा शुभारंभ तसेच ‘माय ट्रेजरी’या पेमेंट गेट वे चे पहिले लुक आणि बिटा व्हर्जनचं अनावरण करण्यात आलं. रुपये, डॅालर, पाऊंड आणि युरो या संदर्भात सर्व व्यवहार माय ट्रेझरी ॲपद्वारे करता येणार आहेत. आर्यन्स ग्रुपच्या सबसिडीचे संचालक कामेश मोदी यांनी ॲप कसं वापरता येईल आणि त्याचे उपयोग याची माहिती सांगितली. सोबतच, ‘धन्वंतरी सॅालव्हटस्’या औषध निर्मिती कंपनीचा शुभारंभ देखील करण्यात आला.


आर्यन्स ग्रुपचा यशोत्सव सुरु झाला असून आता आर्यन्स ग्रुप विविध क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवण्यास सिद्ध झालाय. आर्यन्स ग्रुपची धौडदौड वाऱ्याच्या वेगाने सुरु झाली आहे. पुण्यातील एरंडवणे भागातील डॉ. शामराव कलमाडी हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात मान्यवर आणि आर्यन्स ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखील जाधव आणि गुरुराज पोरे यांनी केलं.


न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा