नवी दिल्ली, १० सप्टेंबर २०२२: AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्रिकरण करण्याची मोहीम असल्याचे सांगत नवा मुद्दा उपस्थित केला आहे. नितीश कुमार आणि विषयी बोलताना त्यांनी, “२००२ च्या दंगलीत ते भाजपसोबत होते, असे ते म्हणाले.
त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सरकारही स्थापन केले आहे. त्यानंतर २०१५ मध्ये ते भाजप सोडून गेले. २०१७ मध्ये पुन्हा मोदींसोबत गेले आणि आता पुन्हा भाजपपासून वेगळे झाले. नितीश कुठे राहणार हे माहीत नाही” असे वक्तव्य केले.
पीएम मोदींचा वन टू वन लढून त्यांचा पराभव होऊ शकत नाही. याचा फायदा फक्त पंतप्रधान मोदींनाच होणार आहे. भाजपला सामोरे जाण्यासाठी वेगळा मार्ग काढावा लागेल. आपण ५४० जागांवर स्पर्धा करावी. ही स्पर्धा सरकारच्या कामांची असावी.
मोदींशी वन टू वन लढले तर ते मुघल, नेहरू आणि व्यवस्थेच्या मागे लपतील, असे ते म्हणाले. त्यांना विचारायचे आहे की जर त्यांचा राष्ट्रवाद इतका प्रबळ असेल तर चीन आमच्या भूमीवर कसा बसला आहे. मला देशात खिचडीचे सरकार बनवायचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड