‘एक होता विदूषक’…आठवणीतला लक्ष्या……

पुणे, १६ डिसेंबर २०२०: मराठी सिनेसृष्टीत आनेक कलाकार होऊन गेले. पण, कमी वेळात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर एक वेगळीच छाप पाडणारा कलावंत म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, २६ ऑक्टोबर १९५४ साली मुंबईत लक्ष्मीकांतचा जन्म झाला. साध्या कुटुंबात जन्मलेला हा कलाकार एक दिवस संपूर्ण देश गाजवेल याचा विचार ही तेव्हा कोणी केला नसेल.

मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता आपल्या कारकिर्दीत लक्ष्मीकांत ने विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपालाही आले. महाराष्ट्रातील घराघरातला तो आपला माणूस झाला.

लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच चित्तवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होती. शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांतने मुंबई मराठी साहित्य संघाकडून व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले.

साहित्य संघामध्ये नोकरी करता करता अभिनय शिकून त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या “टूर टूर” ह्या नाटकामधे प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ते उत्तम विनोदी कलाकार होते. अशोक सराफ, लक्ष्मीकान्त बेर्डे, सचिन, महेश कोठारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटामध्ये काळ गाजवला आहे.

लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने इ.स. १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले धुमधडाका इ.स. १९८५, अशी ही बनवाबनवी इ.स. १९८८ व थरथराट इ.स. १९८९ हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. सूरज बडजात्या दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने इ.स. १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन इ.स. १९९१, बेटा इ.स. १९९२ व हम आपके है कौन इ.स. १९९४इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले.

आगदी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवणारा हा अभिनेता आकाली एक्झिट घेईल आसे कुणाला वाटले देखील नव्हते. किडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी आखेरचा श्वास घेतला. आज लक्ष्मीकांत बेर्डेला जाऊन १६ वर्ष झाली पण आजही टिव्हीवर त्याचा चित्रपट लागला की आवर्जून घरातील सर्व पाहतात. भलेही त्याने जगातुन एक्झिट घेतली पण चाहत्यांच्या मनातुन मात्र नाही, असा आठवणीतला हा कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा