नाशिक, दि.१५ मे २०२०: कोरोनाचा वाढता प्रदूर्भावाचा फटका कांद्याचे माहेर घर असलेल्या लासलगाव कांदा लिलावाला देखील बसला आहे. गेल्या १० दिवसांपासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद आहे. त्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे.
लासलगाव बाजार समिती आणि शहर परिसरात कोरोनाचे ४ रुग्ण आढळून असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून बाजार समितीत लिलाव बंद असल्याने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे.
सध्या उन्हाळी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. मात्र ४ मेपासून लिलाव बंद असल्याने खळ्यात-मळ्यात असलेला कांदा खराब होऊन सडत आहे. त्यामुळे शेतकरी बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी वादळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
कोरोनाच्या भीतीने कामगार येत नाही त्यामुळे कांदा खरेदी कसा करणार असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे शासनाने यावर काही तरी मार्ग काढून लिलाल सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: