बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

बीड, दि.८ मे २०२०: कोरोनामुळे सध्या सगळ्या देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठया संकटात सापडला आहे. कांदा उत्पादनासाठी झालेला खर्च देखील यावर्षी निघाला नसल्याचे सांगताना कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

लॉक डाऊनमुळे व्यापारी भाव पाडून चार ते पाच रुपये किलोने कांदा मागत आहेत, तर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला कांदा शेतातच पडून असल्याने मातीमोल भावात विकण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील साडेचारशे एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. यावर्षी एकरी १८ ते १९ टन कांद्याचे उत्पादन झाले. याशिवाय एका एकरात लागवडीसाठी ५० ते ६० हजार रुपये खर्च झाला होता. चांगला भाव मिळेल म्हणून आम्ही भरपूर खर्च केला.

मात्र, अचानक कोरोनाच्या संकटामुळे बाजारपेठा बंद झाल्या. तसे आमचे स्वप्नही लॉकडाऊन झाले, असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा