गोल पोस्ट कृषी नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठांमधे कांद्याच्या भावात प्रति क्विंटल ९०० रुपयांची घसरण

नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठांमधे कांद्याच्या भावात प्रति क्विंटल ९०० रुपयांची घसरण

नाशिक,४ नोव्हेंबर २०२० : नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठांमधे कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याच्या भावात घसरण झाली. लासलगाव बाजार समितीत प्रतिक्विंटल कांद्याच्या भावात प्रति क्विंटल ८९१ रुपयांची, तर पिंपळगाव बाजार समितीत ९०० रुपयांची सरण झाली.

पिंपळगाव बाजार समितीत आज प्रति क्विंटल कांद्याला ३०० रुपये इतका भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमधे नाराजी दिसून आली आहे. केंद्र सरकारनं कांदा साठवणूकीवर निर्बंध घातल्यामुळे व्यापार्यांनी मागच्या आठवड्यात चार दिवस लिलाव बंद ठेवले होते. त्यानंतर ३० ऑक्टोबरपासून पुन्हा लिलावाला सुरुवात झाली. मात्र कालपासून कांद्याच्या भावात घसरण होऊ लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version