Odisha Crime : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइन गेम्स (Online Gaming) तरुणांची जास्त पसंती बनत चालली आहे. मात्र या खेळाकडे मुलांचा जास्त कल असल्याने मुलांमध्ये मानसिक ताण, अभ्यासात घट अशा समस्या दिसून येत आहेत. त्यामुळे मूल टोकच पाऊल उचलायला सुद्धा मागेपुढे पाहत नाही. याआधी आपण ऑनलाइन गेम्स खेळून बँक खात्यातील २ लाख, ३ लाख रक्कम घालवल्याच्या बातम्या पहिल्याच असतील. आता यापेक्षाही विचित्र घटना ओडिशामधील जगतसिंहपूर जिल्ह्यात घडली आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने त्याच्या स्वत:च्या पालकांची आणि बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे.पोलिसांनी याबबात प्राथमिक तपास करून सांगितले आहे की, आरोपी सुरजकांत याला मोबईल फोनवर ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन होते. त्याला त्याची आई कनकलता आणि वडील प्रशांत सेठी अनेकदा गेम खेळण्यापासून रोखत होते.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, ही घटना समोवारी रात्री ३ वाजता जगतसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जयबाडा सेठी साही येथे घडली असून मंगळवारी सकाळी सुरजकांतच्या कुटुंबीयांनी त्याला गेम खेळण्यापासून रोखले, तेव्हा त्याने त्यांना दगडाने वार करून ठार मारले. त्याचबरोबर २५ वर्षीय बहीण रोझलिन सेठी हिचीही हत्या केली आणि घर सोडून तो गावात लपून बसला. नंतर त्या तरुणाला अटक करण्यात आली, मात्र आरोपीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
एकाच घरातील तीन जणांच्या हत्तेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुरावे गोळा केले. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याबाबत सूर्यकांतने कबूल केले आहे की, त्याने त्याच्या पालकांची हत्या केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर