सनराईज (गुरुकुल) इंग्लिश मीडियम स्कूल व लक्ष्मी – आनंद विद्या मंदिर मधील शिक्षकांशी साधला ऑनलाईन संवाद

माढा, १९ ऑक्टोबर २०२०: श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित, सनराईज (गुरुकुल) इंग्लिश मीडियम स्कूल व लक्ष्मी – आनंद विद्या मंदिर मधील शिक्षकांशी संस्थेच्या सचिव सौ. सुरजा बोबडे यांनी आज सोमवार दिनांक. १९/१०/२०२० रोजी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला.

यामध्ये सुरवातीला संस्थेचे समन्वयक श्री. शंकर सोनटक्के आणि सनराईज इंग्लिश मिडीयम चे प्राचार्य श्री. प्रभाकर सर यांनी थोडक्यात मिटींगचे स्वरूप सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करत असताना उत्तम प्रकारे अभ्यास तसेच विविध व्यक्तिमत्त्वाचे पैलू शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देणे किती गरजेचे आहे. यासंदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले.

तसेच त्यांनी पुढे सांगितले की, जो विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये सहभाग नोंदवू शकत नाही त्या विद्यार्थ्यास आपण कसे शैक्षणिक प्रवाहात आणू शकतो याबद्दल सूचना दिल्या. तसेच त्यांनी सनराईज इंग्लिश मीडिअम स्कूल व लक्ष्मी – आनंद विद्या मंदिर मधील सर्व शिक्षकांचे ते प्रामाणिकपणे करत असलेल्या अध्ययन व वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी बद्दल सर्वांचे कौतुक केले.

नंतर प्रत्येक शिक्षकांना त्यांच्या अभ्यासक्रमाविषयी विचारून माहिती जाणून घेतली व शिक्षकांना सुधारित सूचना दिल्या. सनराईज इंग्लिश मिडीअम व लक्ष्मी – आनंद विद्या मंदिर मधील सर्व शिक्षक उपस्थित होते.

सदरची मीटिंग यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी-आनंदचे राम हुंबे, रमेश जाधव, सागर खुळे यांचे सहकार्य लाभले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा