नवी दिल्ली, दि. १५ जुलै २०२० : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज देशभरात डिजिटल शिक्षण कशाप्रकरे दिले जावे यासाठी ‘प्रज्ञाता’ विशेष दिशा-निर्देश तयार केल्या आहेत. या दिशा-निर्देशामधे डिजिटल शिक्षण देताना स्क्रीन टाईमबाबत मार्गदर्शन करताना पूर्व प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसद्वारे शिक्षण हे ३० मिनिटांपेक्षा जास्त घेण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं आहे. तर इयत्ता पहिली ते आठवीसाठी ३० ते ४० मिनिटांचे दोन ऑनलाईन सेशनमध्ये क्लास घेऊन शिकवावे. तर इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी हे ३० ते ४० मिनिटांचे चार ऑनलाईन सेशन क्लास घेऊन शिक्षण देण्यात यावे, असे या दिशा-निर्देश सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्वीट करून या दिशा-निर्देश शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक यांना डिजिटल शिक्षणसंबंधी मार्गदर्शन म्हणून जाहीर करून स्क्रीन टाईमसोबत डिजिटल माध्यमातून शिक्षण घेत असताना मानसिक-शारीरिक स्ट्रेसला कसे दूर करता येईल याबाबत यामध्ये माहिती दिली आहे.
‘प्रज्ञाता’ दिशा-निर्देशा मधे प्रामुख्याने आठ मुख्य स्टेप्सनुसार ऑनलाईन शिक्षण शिकवतानाच्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.यामध्ये नियोजन,उजळणी करणे,योजने,मार्गदर्शन करणे,बोलणे,अभ्यास करायला, एक विशेष पद्धतीने अभ्यासक्रम पुढे घेऊन जाणे,दाद देणे या महत्वाच्या स्टेप्सवर विशेष सूचना करून त्या अशा स्वरूपात अमलात आणायच्या बाबत सांगितले गेले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी