भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) टर्म इन्श्युरन्सची ऑनलाइन पॉलिसी

नवी दिल्ली २१ जून २०२० : भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) टर्म इन्श्युरन्स प्लॅन टेक टर्म एक प्युअर प्रोटेक्शन ऑनलाईन टर्म इन्श्युरन्स पॉलिसी आहे, जी पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देते. ही पॉलिसी केवळ ऑनलाईन खरेदी करता येते.

टेक टर्म प्लानचा नंबर ८५४ आहे. तर युआयएन नंबर ५१२ एन ३३३ व्ही ०१ आहे. या अंतर्गत कव्हरची रक्कम पॉलिसी घेणार्‍याचा पॉलिसी मॅच्युरिटी पीरियड पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मिळते.

विमा कालावधी पूर्ण होईपर्यंत पॉलिसी कव्हर घेणार्‍या व्यक्तीचा मृत्यू न झाल्यास कोणताही लाभ मिळत नाही. या पॉलिसी अंतर्गत दुर्घटनेतील मृत्यूसह कोणत्याही प्रकरच्या मृत्यूला कव्हर करण्यात आले आहे.मात्र, पॉलिसी घेतल्यानंतर एक वर्षापर्यंत आत्महत्या कव्हर होत नाही.

या टर्म इन्श्युरन्सवर कमीतकमी ग्राह्य रक्कम ५० लाख रुपयेच असेल. यामध्ये कोणतेही अपर लिमिट नसेल. जर कुणी पॉलिसीधारक इन्कम प्रुफ देत असेल तर त्याच्यासाठी उच्च सम अश्युर्ड होऊ शकते. सर्व पॉलिसी धारकांकडे हा पर्याय असेल की, तो सहमाही, वार्षिक किंवा सिंगल प्रीमियमाचा पर्याय निवडू शकतो.

या टर्म इन्श्युरन्ससाठी कमीतकमी कालावधी १० वर्ष आणि कमाल ५० वर्ष असेल. तर, या पॉलिसी अंतर्गत अधिक वय ८० वर्ष असेल. प्रीमियम रेट यावर निर्धारीत होतो की, पॉलिसीधारक स्मोकर आहे की, नॉन-स्मोकर आहे.

१८ वर्षांचा युवक सुद्धा घेऊ शकतो प्लॅन

एलआयसी टेक टर्म प्लॅनची पॉलिसी टर्म १० वर्षांपासून ४० वर्षांपर्यंत चालेल, ग्राहक आपल्या सुविधेनुसार याची निवड करू शकतो. हा विमा प्लॅन १८ वर्ष ते ६५ वर्षांपर्यंत वय असलेल्या व्यक्ती घेऊ शकतात. एलआयसीच्या टेक टर्ममध्ये कमाल मॅच्युरिटीचे वय ८० वर्ष ठेवण्यात आले आहे.

रोज २७ रुपयांच्या प्रीमियमवर ५० लाख रुपयांचे विमा कव्हर
जर एक ३० वर्षांचा व्यक्ती ३० वर्षांच्या टर्मसाठी ५० लाख रुपयांचा टेक टर्म प्लॅन घेत असेल तर त्याचा वार्षिक प्रीमियम जीएसटीसह ९,९१२ रुपये असेल. जर हाच व्यक्ती १ करोड रूपयांचे कव्हर घेत असेल तर त्यास वार्षिक प्रीमियम १७,४४५ रुपये असेल.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा