Nigadi Online stock trading scam in Women: ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवण्याचे स्वप्न दाखवून एका महिलेला तब्बल ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना २५ नोव्हेंबर २०२४ ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत घडली आहे.
पीडित महिलेने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अनिता रिवेरा, जॉन जार्जे आणि इतर सहा बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींनी महिलेला एका अॅप्लिकेशनद्वारे स्टॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखवून, महिलेने ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर महिलेला कोणताही नफा मिळाला नाही आणि तिची गुंतवणूकही परत मिळाली नाही.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेत आहेत. ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, नागरिकांनी अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे