पुणे जिल्हा महिला आघाडी तर्फे ऑनलाईन योग प्रशिक्षण

19

पुणे, दि. २२ जून २०२०: पुणे जिल्हा महिला आघाडी तर्फे २१ जून रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन ऑनलाईन योग प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती, या कार्यशाळेत १२० पेक्षा जास्त महिलांनी रजिस्ट्रेशन करून एक वेगळा विक्रम नोंदवला. बहुसंख्य महिला अतिशय उत्साहाने या पहिल्यावहिल्या ऑनलाईन योग कार्यशाळेत सहभागी झाल्या.

वारजे येथे अनेक वर्षे कार्यरत असलेल्या महिला योग प्रशिक्षक व योगवंदना च्या संचालिका सौ दीपालीताई रेडे यांचे मार्गदर्शन यावेळी लाभले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीर निरोगी राहण्यासाठी ची सर्व योगासने या कार्यशाळेत घेण्यात आली ज्याला महिलांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ मोहिनीताई पत्की , महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ वृषालीताई शेकदार व महासंघाच्या महिला पदाधिकारी यांनी आवर्जून भाग घेतला आणि कार्यक्रमाच्या यशाच्या भागीदार झाल्या. सौ पल्लवी देशमुख यांनी आभार मानले.
या संपूर्ण यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन जिल्ह्याच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ केतकी कुलकर्णी यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा