अवघ्या साडेपाच वर्षाच्या रोशनीने दुथडी भरुन वाहणा-या भीमेला घेतले कवेत

राहू,२४ ऑक्टोबर २०२० : कोरेगावभिवर (ता. दौंड) येथील अवघ्या साडेपाच वर्षाची रोशनी आव्हाळे ही चिमुरडी भीमा नदीच्या पुराच्या पाण्याने दुथडे भरुन वाहणारे नदीपात्र लिलया पार करीत  भीमा नदीला कवेत घेतले.मुसळधार पावसाने भीमा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे. या पुराच्या पाण्यात मोठे पूल वाहून गेले मात्र ही चिमुरडी या पाण्याला कापत नदी पात्र आरपार पोहत आहे.

पाण्याचे रुद्ररुप पाहून इतरांच्या काळाजाचा ठोका चुकविणा-या पाण्यात रोशनी अगदी सहजरित्या भीमा नदीचे पात्रात पार करीत आहे. तिचे हे धाडस पाहून परिसरातील ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
रोशनी आव्हाळे हिने आपले वडील महेश आव्हाळे यांच्याबरोबर दिड वर्षांची असताना नदीमध्ये पोहण्यास सुरुवात केली आणि अवघ्या तीन वर्षांत तिने आपल्या वडिलांसोबत  नदीचे पात्र पार केले आहे. मात्र सध्या होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे भीमा नदी दुथडीभरून एवढे पाणी वाहत असताना रोशनी भीमा नदी पार करीत असल्याने तिचे सर्वत्र गुणगौरव होत आहे.

याबाबत रोशनीचे वडील महेश आव्हाळे म्हणाले की, रोशनी पंधरा महिन्याची झाल्यापासून तिला पोहण्यासाठी भीमा नदीपात्रात नेत असायचो. सुरवातीला पाण्याबात तिच्या मनामध्ये भीती नव्हती त्यामुळे ती नक्की पोहायला शिकेल हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झाला. वयाची दोन वर्षे पूर्ण होतानाच ती पोहायला शिकली. स्वत:हून ती नदीच्या खोल पाण्यात पोहायला लागली.

अर्थात तिची पाण्याबद्दलची भीती संपली होती. तिच्या या लहान वयातल्या कर्तबगारीमुळे गावातील अनेक लहान मुले-मुली पोहायला शिकली. तिचे वाढते धाडस विचारात घेता आता सध्या परतीचा मुसळधार पाऊस होत असल्याने भीमानदी दुथडी भरून वाहत आहे आणि रोशनीचे धाडस पाहण्याची ही नामी संधी आहे म्हणून तिला नदी पार करण्यासाठीं विचारले असता तिने होकार दिला.

वस्तुत: ही नदी पार करण्याचे माझेही धाडस नव्हते परंतु रोशनी हो म्हणाल्यामुळे भीत भीत मला तिला होकार द्यावा लागला आणि धाडसामुळे रोशनीने नदी पार केली. भविष्यात रोशनीला पोहण्यामध्ये करियर करण्याची माझी इच्छा असून आॅलम्पिकची तयारी करण्यासाठी तिला पूर्ण मदत करणार असल्याचे वडील महेश आव्हाळे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा