तरच दारूची दुकाने सुरू होतील :आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. जीवनाश्यक वस्तू वगळता सर्व गोष्टींवर बंधनं आली असल्याने हॉटेल, बार आणि दारुची दुकाने बंद आहेत. राज्यात अनेक ठिकाणी दारुच्या दुकानांमधून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दारुची दुकाने खुली करण्याचे संकेत दिले आहेत.

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.
प्रतिनिधींच्या एका प्रश्नाच उत्तर देताना एका राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत.

यावेळी टोपे यांनी सांगितले की, जर सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं योग्य पालन केलं तर दारुच्या दुकांनावर कोणतीही बंदी असणार नाही. मात्र यावेळी त्यांनी दारुची दुकानं कधी सुरु होतील याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही.

राजेश टोपे यांनी सोमवारी ( दि.२०) रोजी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील परिस्थितीची बद्दलची माहिती दिली. यावेळी त्यांनी काही पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा