पुणे, 8 जून 2022: Oppo ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केलाय. कंपनीने याचं नाव Oppo K10 5G ठेवलं आहे. Oppo K10 (4G) नंतर हा कंपनीचा या सिरीज मधील दुसरा स्मार्टफोन आहे. Oppo K10 (4G) मार्चमध्ये लॉन्च करण्यात आला होता. Oppo K10 5G हा कंपनीचा मिडरेंज स्मार्टफोन आहे.
यामध्ये कंपनीने MediaTek Dimensity 810 प्रोसेसर वापरला आहे. हा ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. Oppo K10 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आलीय. यात 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.
Oppo K10 5G ची किंमत
Oppo K10 5G फक्त एकाच प्रकारात सादर करण्यात आला आहे. त्याच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17,499 रुपये आहे. हा स्मार्ट फोन 15 जूनपासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Oppo K10 5G मिडनाईट ब्लॅक आणि ओशन ब्लू कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. सेलच्या पहिल्या दिवशी हा मोबाइल घेतल्यावर, SBI, Kotak, Axis आणि Bank of Baroda कार्ड वापरकर्त्यांना 1500 रुपयांची सूट दिली जाईल.
Oppo K10 5G ची फीचर्स आणि डिटेल्स
Oppo K10 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि HD रिझोल्यूशनसह 6.5-इंचाची IPS LCD स्क्रीन आहे. या डिवाइस मध्ये MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48-मेगापिक्सलचा आहे. यासोबत 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी, समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर काम करतो. यात 5,000mAh बॅटरी आहे. या डिवाइस मध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा स्मार्ट फोन 5GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो.
न्युज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे