सावेडी नाका येथे चोरट्यांनी लाॅकडाऊनमध्ये साधली संधी

6

अहमदनगर १८.मे२०२०: नगर शहरातील सावेडी नाका येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरट्यांनी लॉकडाऊनच्या काळात चोरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कोतवाली पोलीसांनी दोघांना हत्यारासह जेलबंद केले आहे.

उसवाल इंपिरियल चव्हाण व सेन्थाँल अस्तनंदुर काळे, रा. दोघे कुरण वस्ती, वाळुंज, ता. नगर अशी आरोपींची नावे असून आणखी दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, आरोपींनी १ मे रोजी सदर बँकेतील अलार्म व कॅमेरे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. सदर जागा मालकाने बँक व्यवस्थापकास कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ बँकेत जाऊन या प्रकरणाची कोतवाली पोलीसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी सीटीव्ही फुटेज तपासून गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून सदर आरोपी वाळुंज कुरण वस्ती येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीस त्यांनी दिशाभूल करणारी माहिती दिली असता त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यात हॅण्डग्लोज व लोखंडी सत्तुर आढळून आले.

त्यांच्याविरोधात कोतवाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील उसवाल चव्हाण याच्यावर विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. चौकशीत आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरु आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा