आज ‘या’ तीन आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी…!

मुंबई, २९ सप्टेंबर २०२०: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एका नंतर एक आयपीओ येत आहेत. आज देखील तीन कंपन्यांचे आयपीओ उघडणार आहेत. यामध्ये यूटीआय एएमसी, एक सरकारी मालकीची संरक्षण कंपनी माझगांव डॉक शिपबिल्डर्स आणि लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांचा समावेश आहे. या तिन्ही कंपन्यांचे आयपीओ २९ सप्टेंबर रोजी उघडतील आणि गुरुवारी म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी बंद होतील.

वास्तविक, जर आपल्याला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण त्यावर पैसे लावू शकता. पूर्वी आलेल्या सर्व आयपीओनी सर्वांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. आपण यूटीआय एएमसी (यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी) च्या आयपीओमध्ये १ ऑक्टोबर पर्यंत गुंतवणूक करू शकता.

यूटीआय एएमसी आयपीओची किंमत बँड ५५२-५५४ रुपये निश्चित केली गेली आहे. कंपनी या इश्यू मध्ये ३,८९,८७,०८१ शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीस काढणार आहे. यूटीआय एएमसी’नं आयपीओ मधून २,१६० कोटी रुपये उभे करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यात २७ शेअर्सचा एक लॉट असेल.

यूटीआय एएमसी ही देशातील सर्वात जुनी म्युच्युअल फंड कंपनी आहे. निप्पॉन लाइफ इंडिया अ‍ॅसेट मॅनेजमेंट आणि एचडीएफसी एएमसी नंतर युटीआय एएमसी ही स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणारी तिसरी एएमसी कंपनी ठरणार आहे. तथापि, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही वित्तीय तज्ञाचा सल्ला घ्या.

माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा आयपीओ

संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स च्या आयपीओची किंमत प्रति शेअर १३५-१४५ निश्चित करण्यात आलीय. या आयपीओ अंतर्गत ३,०५,९९,०१७ शेअर्स (ओएफएस) विक्री केली जाईल असं कंपनी’नं म्हटलं आहे. या आयपीओमध्ये आपण १ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. या आयपीओचा लॉट साइज १०३ शेअर्सचा आहे.

आयपीओद्वारे ४४४ कोटी रुपये जमा करण्याची कंपनीची योजना आहे. येस सिक्युरिटीज, अ‍ॅक्सिस कॅपिटल, एडलविस फायनान्शियल, आयडीएफसी सिक्युरिटीज आणि जेएम फायनान्शियल या संस्था आयपीओ व्यवस्थापित करतील. माझगाव डॉक ही सरकारी मालकीची शिपयार्ड कंपनी आहे. ही नौदल आणि तटरक्षक दलासाठी युद्धनौका आणि पाणबुडीसाठी कार्य करते.

 

लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

हैदराबादस्थित तेल आणि गॅस पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनी लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे आयपीओ आजपासून उघडणार आहे आणि १ ऑक्टोबरला बंद होईल. या आयपीओद्वारे कंपनीचं ६१.२० कोटी रुपये उभे करण्याचं उद्दीष्ट आहे. या आयपीओसाठी प्रति शेअर किंमत बँड ११७ ते १२० रुपये निश्चित करण्यात आले आहे. आयपीओकडून मिळालेली रक्कम कंपनी आपल्या कार्यरत भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी वापरेल, जेणेकरुन तेल आणि गॅस क्षेत्रातील वाढती मागणीचा फायदा होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा