अंतराळ आणि अणु तंत्रज्ञानाची पूर्ण क्षमतेने वापर करण्याची संधी: डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, दि. १८ मे २०२०: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल सांगितले की कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज बरोबरच अन्य गोष्टींमुळे वैद्यकीय आयसोटोप्सचा वापर करून कर्करोगाच्या परवडणाऱ्या उपचारांना प्रोत्साहन मिळेल. तसेच अणुऊर्जा विभागाच्या (डीएई) अखत्यारीत पीपीपी (सार्वजनिक-खाजगी-सहभाग) द्वारे  एक विशेष अणुभट्टी स्थापन  करता येईल.

आर्थिक पॅकेज नाविन्यपूर्ण, भविष्यवादी आणि धाडसी असल्याचे नमूद करत डॉ. जितेंद्र सिंह, हे अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे  प्रभारी राज्यमंत्री देखील आहेत,  ते म्हणाले की सहा दशकांहून अधिक काळ भारताचे अवकाश तंत्रज्ञान आणि अणुऊर्जा गोपनीयतेच्या आच्छादनाखाली कार्यरत आहे परंतू चौकटीबाहेरचे नवीन किंवा दुस-या कोणत्याही गोष्टीचे नियोजन करायला मनाई होती त्यामुळे मर्यादित क्षेत्रात जे चालू आहे त्यासह कार्य सुरू ठेवण्यात आले.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच अणुऊर्जा विभागाला विविध क्षेत्रांमध्ये तसेच आपल्या दैनंदिन जीवनाच्या हितासाठी वापर करण्याची संधी मिळाली. डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, भारतात वैद्यकीय आयसोटोप्सचे उत्पादन कर्करोग आणि इतर आजारांवर परवडणारे उपचारच उपलब्ध करून देणार नाही तर जगभरात मानवतेची सेवाही करेल. ते म्हणाले, पॅकेजमधील इतर अणुऊर्जाशी संबंधित सुधारणा अन्न टिकवण्यासाठी आणि ते दीर्घकाळ टिकवण्यासाठी विकिरण तंत्रज्ञानाच्या वापराशी संबंधित आहे. ते म्हणाले, हे ज्ञान आपल्या वैज्ञानिकांकडे  उपलब्ध आहे परंतु पीपीपी मोडमध्ये रेडियेशन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन प्रथमच दिले जात आहे. .

अंतराळाबाबत बोलताना डॉ. जितेंद्रसिंग यांनी  स्पेस / इस्रोमध्ये खासगी क्षेत्राला सामावून घेण्याच्या दृष्टीने आर्थिक पॅकेजमध्ये सुधारणा असल्याकडे लक्ष वेधले यामुळे  खासगी कंपन्यांना उपग्रह प्रक्षेपण आणि त्यासंबंधी कामांमध्ये समान संधी  उपलब्ध होतील. याव्यतिरिक्त, तांत्रिक उद्योजकांना रिमोट सेन्सिंग डेटा प्रदान करण्यासाठी उदार भौगोलिक धोरणाला परवानगी देणे हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, नवीन आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या अंतराळ आणि अणू क्षमतांना त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर प्रत्यक्षात साकारण्याची अनोखी संधी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा