पणजी, १८ जुलै २०२३: आज गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. दोन दिवसांपूर्वी कला अकादमीच्या खुल्या सभागृहाच्या रंगामंचाचे स्लॅब कोसळले होते. त्यावरुन विरोधकांनी आज सभागृहात सुरुवातीलाच गदारोळ सुरू केला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी करा, कला अकादमीच्या कोसळल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशी करा, अशा मागण्याचे फलक घेऊन गोवा फॉरवर्ड पक्षाची आमदार विजय सरदेसाई हे सुरुवातीला सभापतींच्या समोर गेले. त्यानंतर काँग्रेसचे तीन आमदार, आपचे दोन आमदार व आरजी पक्षाचा एक असे सातही विरोधी आमदार सभापती समोर गेले.
सुरवातीलाच कला अकादमीच्या संदर्भात चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सभापती रमेश तवडकर यांनी प्रश्नोत्तराच्या तास झाल्यानंतर चर्चा करु, असे आश्वासन दिले. मात्र विरोधक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही प्रश्नोत्तराच्या तासानंतर आपण या विषयावर प्रतिक्रिया देतो. असे सांगितले.तरीही घोषणाबाजी सुरूच राहिली.
विरोधक ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे शेवटी सभापतींनी काही वेळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. पावसाळी अधिवेशनाची सुरुवातच आज कला अकादमीच्या विषयावरुन झाली असून यापुढेही विधानसभेमध्ये हा विषय बराच गाजण्याची शक्यता आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर