गोल पोस्ट महाराष्ट्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२० : महाराष्ट्र राज्याचे भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून, याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी कोरोना होण्याचे सत्र सुरूच आहे. यात नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांच्या ट्विट वरून समजते . त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली असून, त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता त्यात त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.’ असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version