गोल पोस्ट महाराष्ट्र बर्गेवाडीकरांच्या हाकेला विरोधीपक्ष नेत्या पूजा म्हेत्रे यांनी दिला न्याय

बर्गेवाडीकरांच्या हाकेला विरोधीपक्ष नेत्या पूजा म्हेत्रे यांनी दिला न्याय

कर्जत, ५ ऑगस्ट २०२०: कर्जत नगर पंचायत अंतर्गत बर्गेवाडी येथील स्मशानभूमी मध्ये चार-पाच दिवसापूर्वी संशयित रुग्ण आणून मध्यरात्री जाळण्यात आले, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून विरोधीपक्ष नेत्या सौ पूजा संतोष म्हेत्रे यांनी आज अग्निशामक दलाच्या गाडीने औषध फवारणी करून घेतली.

कर्जत येथे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत असताना कर्जत नगर पंचायतीने एका संशयित रुग्णाचा मृतदेह मध्यरात्री बर्गेवाडी येथील स्मशानभूमीत जाळण्यात आला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली असून येथील नागरिकांनी याबाबत नगर पंचायतीकडे तक्रार केली आहे.

मात्र गेली चार-पाच दिवसात कोणतीही खबरदारी न घेतल्याने आज विरोधी पक्षनेत्या पूजा संतोष म्हेत्रे यांनी स्वतः नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाच्या वाहनाद्वारे स्मशानभूमी व परिसरातील वस्त्यांवर औषध फवारणी करून लोकांना घाबरून जाऊ नये असे आवाहन केले, चार दिवस होऊनही येथील सदर मयताची राखही भरून टाकण्यात आली नाही, यामुळे येथे संशयित रुग्ण जाळण्यासाठी आणू नयेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दत्ताभाऊ पिसाळ यांनी स्थानिक समस्या मांडल्या, यावेळी माजी उपसरपंच संतोष म्हेत्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version