पणजी, ३१ जुलै २०२३ : गोवा विधानसभेत आज सकाळी मोठा अनुचित प्रकार घडला. मगोप आमदार जीत आरोळकर यांना धक्काबुक्की करणे, माईक काढून टाकणे, त्यांच्या डोक्यावर सुरक्षा रक्षकांची टोपी जबरदस्तीने घालणे, असे प्रकार केल्याबद्दल काँगेसच्या तीन आमदारांसह विरोधी सात आमदारांना दोन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
शुन्य प्रहरावेळी काळे कपडे परिधान करून आलेल्या विरोधी आमदारांनी मणिपूर प्रश्नांवर चर्चेसाठी मागणी करत सभापतीसमोर गदारोळ घातला. सभापतींनी शुक्रवारी खाजगी विधेयकाचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी यावर चर्चा होऊ शकते असे सांगितले. मात्र, विरोधी आमदार आक्रमक होऊन हातात फलक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या आसनासोर आले व त्यांना घेराव घातला. असा प्रकार आतापर्यंत कधीच झाला नव्हता.
त्यानंतर शून्य प्रहार सभापतींनी जाहीर केल्यामुळे आमदार जीत आरोळकर हे बोलण्यास उभे राहिले असता, सर्व विरोधी सातही आमदार त्यांच्या जवळ गेले. व त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचा शर्ट ओढला. सुरक्षा रक्षकांची टोपी त्यांच्या डोक्यावर चढवली. त्यांचा हातातील कागद काढून घेतला आणि माईक हिसकावला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील सर्वच सदस्य संतप्त झाले. या कारणांमुळे सभापतींनी सर्व आमदारांना दोन दिवसांसाठी निलंबित केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर