माढा तालक्यातील रूई ते भाटनिमगाव या बंधाऱ्याच्या दुरूस्तीचा आदेश; बंधाऱ्याची उंची दिड मीटरने वाढवणार 

माढा, दि. ८ ऑगस्ट २०२०: माढा तालुक्यातील कोंढार भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न मिटण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कोंढार भागातील रुई ते भांडगाव हा कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा व उंची वाढवण्याचा आदेश जलसंपदा विभागाने दिला आहे. मौजे रूई व भाटनिमगाव तालुका इंदापूर येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या उंची वाढवण्याच्या कामाला कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील शिल्लक असलेल्या पाणीपट्टी रक्कमेमधून १.७३ कोटी इतके रक्कमेचा निधी उपलब्ध करण्याबाबतचा जलसंपदा विभागाने आदेश दिल्यानुसार हि रक्कम मुख्य अभियंता जलसंपदा कपोले साहेब यांनी मंजूर करणे बाबतचे पञ कृष्णा खोरे यांनी विकास महामंडळाला दिले.

सदर बंधारा चुकीच्या ठिकाणी व उथळ जागेवर बांधल्यामुळे नदीचे पाणी बंद झाले की बंधारा कोरडा पडायचा. लोकांना शेतीसाठी तर सोडाच पण नदीकाठच्या गावांच्या पाणीपुरवठा योजना सुद्धा पाण्याअभावी बंद ठेवाव्या लागत आहेत. सद्य परिस्थितीत हा बंधारा नादुरुस्त असल्याने या बंधाऱ्यावरील शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे गेली अनेक दिवसांपासूनची मागणी जलसंपदा विभागाने मान्य केल्याने नागरिकातून आनंद व्यक्त केला जात आहे. या बंधाऱ्याची उंची आता दीड मीटरने वाढणार असून भीमा नदीवरील ईतर बंधाऱ्याप्रमाणे याही बंधाऱ्यातून उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी मिळेल.

 

या कामासाठी गेलीे दहा वर्षे झाले अनेक प्रकारे आंदोलने व निवेदने देऊनही यश येत नव्हते. यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसपदा मंत्री जयंत पाटील व बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार, माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे, इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील, भिमानगर जिल्हा परिषद सदस्या अंजनादेवी पाटील, आलेगाव खुर्दचे हरिभाऊ माने, राजेंद्र धडस या सर्वांनी पाठपुरावा करून सदर प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. या  बंधाऱ्यावर एकूण ८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द, रुई, आलेगाव बुद्रुक, वडोली रांझणी या गावात बरोबरच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव, भाटनिमगा व बेडसिंग, गलांडवाडी, अवसरी, वडापुरी, सुरवड या गावांना फायदा होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा