मुंबई: चीनबरोबरच इटली, साऊथ कोरिया, इराण आदी देशांमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. हा रोग झपाट्याने अन्य देशांमध्ये पसरत असल्यामुळे बॉलीवूडचे तसेच अन्य भाषिक चित्रपटांचे परदेशातील चित्रीकरण थंडावले आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन ने ठरवले आहे की येत्या ३१ तारखेपर्यंत सर्व प्रकारचे चित्रीकरण थांबविण्यात येणार आहे.
इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन ने १९-३-२०२० पासून ते ३१-३-२०२० सर्व चित्रपट निर्माते तसेच वाहिन्यांवरील कार्यक्रमांचे चित्रिकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या मालिका, चित्रपट व इतर कामकाज थांबवण्यात येणार आहे. त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व सिनेमागृहे, नाटक गृह, मॉल्स यांसारखे ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागार्जुनच्या “वाईल्ड डॉन’ या चित्रपटाचे थायलंड येथे चित्रीकरण होणार होते. परंतु तो कोरोनामुळे स्थगित करण्यात आले आहे. याबरोबरच अन्य काही हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. अभिनेता कमल हसनच्या “इंडियन 2′ या चित्रपटाचे चित्रीकरण चीनमध्ये होणार होते. मात्र कोरोना व्हायरस चीनमध्ये वेगाने वाढत असल्या कारणाने त्यांच्या चित्रपटाचे चित्रकरण पुढे ढकलण्यात आले आहे. भारताबरोबरच परदेशातही बऱ्याच हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. काही सेलिब्रेटी चित्रीकरणासाठी किंवा फिरण्यासाठी परदेशात जात असतात. परंतु आता कोरोनामुळे परदेशात जाणे टाळले आहे.
सरकार कडून पुढील परिपत्रक येण्यापर्यंत सर्व कामकाज थांबवण्याचा निर्णय इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन ने घेतला आहे. ३१ तारखे नंतर आपला पुढील निर्णय कळवू असे त्यांनी सांगितले.