AISSMS च्या वतीने आर्थिक साक्षरतेद्वारे महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन

11

पुणे, १० मे २०२३: AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने WICCI (FLM) (वुमेन्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री)च्या सहकार्याने आर्थिक साक्षरतेद्वारे महिला सक्षमीकरण या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. गौरी प्रभू, महाराष्ट्र राज्य, WICCI (FLM) च्या अध्यक्षा यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यावर आणि त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यावर भर दिला.

डॉ. स्वेतलाना तातुस्कर, WICCI (FLM) च्या उपाध्यक्षा म्हणाल्या की, आर्थिक ज्ञान देऊन, महिला त्यांच्या आर्थिक निवडींसाठी अधिक जबाबदारी स्वीकारतील आणि आकस्मिक परिस्थितीसाठी निधी बाजूला ठेवतील.

एआयएसएसएमएस आयओएमचे संचालक डॉ. अभिजित मंचरकर यांनी सांगितले की, पुरुष आणि महिलांना आर्थिक स्वातंत्र्याची जाणीव करून दिली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गौरी प्रभू व प्रा.वर्षा केदार यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी (मी पत्रकार) : बाबासाहेब रक्क्षे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा