फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अजय माळवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

फलटण, २७ जानेवारी २०२३ : फलटण नगरपरिषदेचे कार्यक्षम, तरुण तडफदार नगरसेवक आणि धडाडीचे पत्रकार अजय माळवे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. २९) विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गजराज तरुण मंडळाचे अध्यक्ष तात्या तेली यांनी दिली.

अजय माळवे यांच्या वाढदिवसानिमित्त अजय माळवे मित्रमंडळ, गजराज तरुण मंडळ, मराठी पत्रकार परिषदेच्या संयुक्त सहकार्याने आणि फलटण ब्लड बॅंक, एन. व्ही. देसाई आय हॉस्पिटल हडपसर, पुणे यांच्या सहकार्याने रविवारी (ता. २९ जानेवारी) तेली गल्ली, बुधवार पेठ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.; तसेच वृक्षारोपण, महात्मा गांधी शिक्षण संस्थेच्या मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न, वृद्धाश्रमात फळवाटप करण्यात येणार आहे.

अजय माळवे हे तेली गल्ली, बुधवार पेठ येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार आहेत, अशी माहिती तात्या तेली यांनी दिली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा